Showing posts with label मुलाखत. Show all posts
Showing posts with label मुलाखत. Show all posts

Sunday, March 4, 2018

मी मराठी..... माझी स्वाक्षरी मराठी (गोपाळ वाकोडे सरांची मुलाखत)

नमस्कार
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषेच्या प्रगती साठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी बोलले पाहिजे, मराठी वाचन केले पाहिजे आणि हा संकल्प केवळ एका दिवासापुरता मर्यादित न ठेवता कायम त्याचं जतन केल पाहिजे.
आपण बरेच जण मराठी भाषेच्या प्रगतिसाठी बोलत असतो, विचार करत असतो पण अश्या काही व्यक्ति असतात, त्या आपल्या विचाराला कृतीची जोड़ देतात.
असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे Gopal Wakode सर.
बुलडाणा जिल्ह्यातील शाळेमध्ये चित्रकला शिक्षक असणाऱ्या गोपाळ सरानी प्रत्येक मराठी माणसाला मराठीमध्ये स्वाक्षरी शिकवण्यासाठी " मी मराठी..... माझी स्वाक्षरी मराठी" हा उपक्रम हाती घेतलाय. ते २००५ पासून प्रत्येक मराठी साहित्य संमेलना मध्ये जावून मराठी मध्ये स्वाक्षरी करण्यासाठी प्रबोधन करतात. गेल्या १२ वर्षात त्यानी ३ लाखां पेक्षा जास्त लोकांना मराठी मध्ये स्वाक्षरी शिकवली आहे.
१६ ते १८ फेब्रुवारी रोजी बड़ोदा येथे भरलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मध्ये गोपाळ सरांना भेटायचा योग आला. मी आणि माझा मित्र श्रीराम मलांडे याने १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतलेली गोपाळ सरांची मुलाखत नक्की वाचा......तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.






गोपाळ वाकोडे सरांनी आम्हाला मराठीमध्ये शिकवलेली स्वाक्षरी










                                                   गोपाळ सर, श्रीराम मलांडे आणि मी